राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना अभिवादन कार्यक्रम
चंद्रपूर :- महापुरुषांचे कार्य देशासाठी अतुलनीय आहे. त्यांचे विचार अजरामर राहिले पाहिजे, या दृष्टीने भाजपा कार्यकर्त्यांनी कार्य करावे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने अशक्य ते शक्य करून दाखविले. देशाला सहिष्णुतेचा मूलमंत्र दिला. तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी जय जवान, जय किसान..चा नारा देत देशाला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न साकारले. यालाच पुढे अटलजींनी जय विज्ञानची जोड देत आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानात स्वबळावर देशाला सक्षम केले. या महापुरुषांच्या त्रिसूत्रीवरच भारत देश घडून प्रगतीपथावर अग्रेसर होत असल्याचे प्रतिपादन मनपाचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.
स्थानिक जगन्नाथबाबा नगर येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी थोर महात्मांना आदरांजली अर्पण केली. देश आणि समाजाच्या विकासासाठी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे विचार आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी विचार मांडले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्राध्यापक रवी जोगी, पश्चिम महानगर महामंत्री संजय निखारे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अक्षय शिंदे, महेश राऊत, अमित गौरकार, अमोल मते, चेतन घागरगुंडे, आदी उपस्थित होते.
