रामनगर गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर :- एका गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा विभागाने शहरातील जल नगर, दूध डेअरी परिसरातून एका आरोपीला 2 किलो गांज्यासह अटक केली आहे. ही कारवाई 7 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
येथील बंगाली कॅम्प, शंकरनगर परिसरात राहणारा आरोपी सुजन जितेन मालो (30) हा शुक्रवारी जुन्या बजाज मोटारसायकल क्र. एमएच 33 ई 978 वाहनाने गांजा घेवून अवैधरित्या दूध डेअरीच्या मार्गाने जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी दूध डेअरी रोडवर नाकाबंदी केली. यादरम्यान एक संशयित व्यक्ती दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वाहनात ठेवलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 2 किलो 300 ग्रॅम गांजा आढळून आला. गांजाची किंमत 20,300 रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी सुजन हा गेल्या एक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक वर्षभरानंतर तो गांजा घेवून चंद्रपूर येथे आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजन हा गांजाचा सैंपल दाखवण्यासाठी चंद्रपूरला आला होता. यावरून आरोपीकडे मोठ्या प्रमाणात गांजा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, एसडीपीओ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेश मुळे, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात पीएसआय विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, सतीश अवथरे, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता आदींनी केली.
