*चंद्रपूर*:- डी जी टी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई कौशल्य रोजगार उद्योजकात आणि नाविन्यत्या विभाग यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य पदवीदान दीक्षांत समारोह साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता
संस्थेचे सचिव अमित केरगुडे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकात अधिकारी भाग्यश्री वाघमारे सरपंच मंजुषा येरगुडे साई अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद गोरवंटीवार राजेश पी शेट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते अखिल भारतीय व्यवसाय प्रशिक्षण 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक व्यवसाय निहाय प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या 15 प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले संचालन व आभार वर्षा गावंडे यांनी मांडले यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

