‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई का नाही?
चंद्रपूर :- येथील एक दारू भट्टी केवळ साध्या शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वर्ष होऊनही सुरू आहे. दारु उत्पादन शिल्क विभागाच्या या नागोंदी कारभाराबद्दल अनेक तक्रारी वरच्या पातळीवर संबंधित विभागाला करण्यात आल्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांवर येथील अधीक्षकाने कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अनेक प्रकारणात योग्य कागदपत्रांची पूर्तता नसताना देखील कागदीघोडे नाचवून परवाने दिले गेले आहे. या सर्व धक्कादायक प्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे रितसर तक्रार सुद्धा करण्यात आली. परंतु, या तक्रारींनाही बगल दिल्याने पालकमंत्र्याच्या पत्रांना संबंधित अधिक्षकांने केराची टोपली दाखवल्याचे सध्या बोलल्या जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी तत्कालीन आघाडी शासनाने उठविल्यावर अनेक धांदली या उत्पादन शुल्क विभागात दिसून आल्या आहेत. जुने बांधकामाच्या सर्टिफिकेट देत पुन्हा ती दारू भट्टी जैसे थे असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन बांधकामाचे सर्टिफिकेट महापालिकेकडून घेतल्या गेल्याचेही दिसून आलेले नाही. जुन्या परवान्यांचे नुतनीकरण करताना आवश्यक कागदपत्र नसतानाही दारुचे दुकाने सुरू केल्या गेले आहे. अशाच पुन्हा एका दुस-या प्रकरणात दारुभट्टी करीता एका वृद्ध महिलेचे डुप्लिकेट स्वाक्षरी घेतल्या गेली आणि ती भट्टी तशी सुरू असून याबद्दलही अनेक तक्रारी सदर कुटुंबाकडून करण्यात आल्या आहेत. परंतु, संबंधित विभागाच्या अधिक्षकांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणात अर्थपूर्ण देवान घेवान तर झाली नाही ना, अशी शंका घेतली जात आहे. सदर विभागातील गलथान कारभार समोर यावा, यासाठी संबंधित अधिका-यांच्या संपत्तीची ईडी चौकशी व्हावी, अशीही मागणी अलिकडेच शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने केली होती. दारु दुकाने सुरू करताना उघड होणारा गलथान कारभार बंद व्हावा व उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांचे मनमानी कारभाराला वेसन घालावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्याची उटी चौकशी सुद्धा करावी, अशी मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जातीने लक्ष घालण्याची आता खरी गरज आहे.
