दोन मुलांची हत्या करून फरार वडीलाने केली स्वतः आत्महत्या*



वरोरा येथील धक्कादायक घटना


वरोरा : - नागपूर महामार्गावरील वरोरा तालुक्यातील बोर्डा परिसरात वडिलांनी स्वतःच्या मुलाना विष पाजून हत्या केल्याची दुःखद घटना काल दि. 2 ला दुपारी 3 च्या सुमारास घडली होती. तर हत्या करून फरार झालेल्या बापाने दुसऱ्या दिवशी स्वतःही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले
वरोरा शहरा लगत शालिमार ट्रेडर्स च्या मागे बोर्डा या परिसरात कांबळे परिवार किरायाने राहत असून संजय श्रीराम कांबळे हे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होते. गेल्या काही दिवसापासून मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आले होते. त्यांची पत्नी डी फॉम कॉलेजमध्ये कंत्राटी बेस वर काम करत असून संसार सुरळीत चालला होता.
मात्र या सुखी संसाराला वडिलांची नजर लागली . दोन्ही मुलांना सुमित संजय कांबळे 7 वर्ष, मुलगी मिस्त्री संजय कांबळे 3वर्ष, या दोघांनाही राहत्या घरी विष देऊन हत्या करण्यात आली. यानंतर मुलाची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून असल्याचे दिसतात आईने आरडाओरडा सुरू केला . लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. व पोलिसात तक्रार करण्यात आहे.  मात्र तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती. या हत्ते मागील कारण अजून पर्यंत कळले नाही.  कुटुंबातील परिवारावर शोक कळा पसरली असून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजून व मुलांचा गळा आवळून हत्या केली असल्याचा अंदाज वरोरा येथील उप रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला जात आहे. 
या घटनेने परिसरात शांतता पसरली असून वरोरा पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

 *दोन मुलांची हत्या करून फरार वडीलाने केली स्वतः आत्महत्या* 
आज दि. 3 ला सकाळी समुद्रपूर तालुक्यातील  साखरा येथील राहत्या गावात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस पुढील तपास घेत असून संजय कांबळे याचा मृतदेह मंगरूळ रोड नजीक एका शेतामध्ये आढळला असून असून गिरड पोलीस पुढील तपास करीत आहे.मुलांना मारल्यानंतर एक चिठ्ठी सुद्धा सोडण्यात आली होती. त्यामध्ये मी स्वतः मुलांना मारत असल्याची कबुली देत नातेवाईक व इतर लोकांना त्रास न देण्याची विनंती चिठ्ठी मध्ये करून ठेवली होती. मात्र मुलांना व स्वतः आत्महत्या करण्याचे कारण चिठ्ठी मध्ये नमूद केले नव्हते.
त्यामुळे आत्महत्या आणि दोन लहान मुलांची हत्तेचे कारण अजूनही कळू शकले नाही.
मात्र आर्थिक विवेचनेतून ही आत्महत्या व हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post