श्रद्धा हा प्रत्येकाच्या निष्ठेचा भाग : प्रा.अमोल ठाकरे*



भद्रावती :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा, भद्रावती तर्फे विजासन टेकडी (बुद्ध लेणी) या ठिकाणी डॉ. नरेंद्र दाभोळकर 09 वा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला. श्रद्धा- अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन करताना विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील प्रा. अमोल ठाकरे म्हणाले की, औपचारिक शिक्षण न घेतलेला व्यक्तीही शिक्षित असतो. श्रद्धा हा प्रत्येक व्यक्तीच्या निष्ठेचा भाग असतो. परंतु सत्य आणि श्रद्धा यामध्ये  साम्यता असली पाहिजे. सदर कार्यक्रमाचे संचालन अशोक जवादे, प्रास्ताविक लताबाई टिपले, प्रमुख मार्गदर्शन प्राध्यापक अमोल ठाकरे तर आभार शारदा खोब्रागडे यांनी मानले. नामदेव रामटेके, रवी वानखेडे, चंद्रकला गेडाम, विवेक महाकरकार, अनिताबाई भजभुजे, रमेश गेडाम, सूरदास खोब्रागडे, रत्नाकर साठे, रामलाल बनसोड, संतोष वाळके यांनी अंधश्रद्धेवर विचार मांडले. 
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा, भद्रावतीचे सर्व सदस्य आणि विजासन येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post