तलाठी सुनिल रामटेके यांना मातृशोक जिजाबाई शामराव रामटेके यांचे दुःखद निधन !





चंद्रपूर : शहरातील जटपुरा वार्ड येथील प्रतिष्ठित रहिवासी श्रीमती जिजाबाई शामराव रामटेके यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी साडे अकरा वाजता दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८३ वर्षे होते. त्यांच्या निधनाने परिसरात व नातलगात शोक कळा पसरली आहे. श्रीमती जिजाबाई रामटेके गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या श्रीमती जिजाबाई, रेल्वे अधिकारी अनिल रामटेके " तलाठी सुनिल रामटेके व राहुल रामटेके यांच्या मातोश्री होत. मृत्यूपश्चात त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे .
रविवार दि १४ ऑगस्ट २० २२ ला सकाळी ११ वाजता त्यांचे निवास स्थान जटपुरा वार्ड, दै. चंद्रपूर समाचार भवन येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल. बिनबा गेट जवळील शांतीधाम स्मशान भूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार केले जातील .
Post a Comment (0)
Previous Post Next Post