चंद्रपूर:- लोकशाहीच्या आधारस्तंभ महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ चंद्रपूर तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्त पत्रकारांची भूमिका व कार्यशाळेचे आयोजन 14 ऑगस्ट रोजी मोनालिना सेलिब्रेशन ( खोब्रागडे हॉल ) जयंत टॉकीज समोर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मार्लापण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी लेखक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रा इशादास भडके उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. अमोल पोतदार, डी.के. आरीकर व कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती चंद्रपूर समाचारचे संपादक चंद्रगुप्त रायपुरे, पत्रकार तीराणिक प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी सत्कारमूर्ती किशोर पोतनवार, सोमेश्वर येलचलवार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत मान्यवरांनी आजच्या आधुनिक युगातील पत्रकारितेचे संदर्भ व पारदर्शीता यावर आपले मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन गोपी मित्र, मोकाशी, धनंजय तावाडे सचिन बोबडे शशी ठक्कर यांनी आर्थिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
