ट्रकची दुचाकीस्वरास धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी*



चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील अपघात

चद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील बनार पुलाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली.
बायपास मार्गावर आरटीओकडून अवजड वाहनांच्या पासिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अवजड वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. ट्रक क्र. एमएच 34 एबी 2287 क्रमांकाची गाडी पुलाजवळून यू टर्न घेत होती. मात्र ट्रक चालकाने कोणताही सिग्नल न देता अचानक वळसा घेतला. अचानक वळण घेतल्याने शहराच्या दिशेने जाणाऱ्या संदीप नरवडे या दुचाकीस्वाराला ट्रकने धडक दिली. ज्यामध्ये प्रदीप नरवडे हा गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच आपचे पदाधिकारी राजू कुडे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले व पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्च ट्रक मालकाने उचलण्याची मागणी केली. शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला.चंद्रपूर बल्लारपूरचा हा मार्ग देखील महाराष्ट्र आंध्र प्रदेश आंतरराज्य महामार्ग आहे. शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या बनार पुलापासून काही अंतरावर आरटीओने अवजड वाहनांच्या पासिंगसाठी जागा निश्चित केली आहे. येथे बल्लारपूर ते चंद्रपूर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. तेथून पुढे गेल्यावर या वाहनांना एकेरी मार्गावरून पुढे येऊन पुलाजवळून वळावे लागते. आजचा अपघातही याच कारणामुळे झाला असल्याचे दिसून येत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post