राष्ट्र वार्ता बातमीच्या दणक्यानंतर अखेर उत्पादन शुल्क कार्यालयात ‘तो’ फलक लागला




माहिती अधिकार कायद्याची सर्वांना मिळणार माहिती : नागरिकांना दिलासा

चंद्रपूर : चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात माहिती अधिकाराचा फलकच नाही, या आशयाची बातमी नुकतीच राष्ट्र वार्ताने प्रकाशित केली होती. शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकाराचा फलक लावणे अनिवार्य आताना उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचा फलकच नव्हता. त्यामुळे एकप्रकारे शासकीय नियमांनाच तिलांजली दिल्या जात असल्याचे वृत्त प्रकाशित होताच अखेर प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत कार्यालयात माहिती अधिकार कायद्याचा फलक लावल्याने राष्ट्र वार्ता बातमीच्या दणक्या नंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.सदर कार्यालयात माहितीचा अधिकार फलक नसल्यने माहिती घेण्याकरिता आलेल्या लोकांना याबद्दल सभ्रम निर्माण होऊन माहिती कुणाला मागावी, कुणाकडे जावे.. असा प्रश्न निर्माण होत होता. कार्यालयातील बाबूच्या टेबलवरती त्यांच्या नावाचे आणि पदाची व नेमप्लेट सुद्धा लावून नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले होते. शासकीय नियमांची अंमलबजाणी करण्याबाबत या कार्यालयामध्ये अनास्था दिसून आली. या महत्वपूर्ण शासकीय आदेशाचे कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून पालन होत नव्हते. त्यामुळे नागरिकांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र, सदर विषय राष्ट्र वार्ताने उचलून धरत याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर बातमीच्या दणक्याने संबंधित अधिका-यांना जाग आली. व त्यांनी माहिती अधिकाराचा फलक लावला. त्यामुळे आता नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post