चंद्रपूरसह जिल्ह्यात सुगंधी तबाखुचा गोरखधंदा सुरूच



सुगंधित तंबाखू व गुटका तस्करांना आशीर्वाद कुणाचा?

अन्न व औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

चंद्रपूर :- राज्यात सुगंधीत तंबाखू व गुटखा बंदी असतानाही चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात सुगंधीत तंबाखू व गुटख्याची अवैध तस्करी व वाहतूक सुरू आहे. या गोरखधंद्यामध्ये शहरातील मोठ मोठे डिलर्स व तंबाखू विक्रेते सहभागी आहे. परंतु, याकडे जिल्हा प्रशासन व अन्न आणि औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ना कुठली कारवाई ना कुठलेही धाडसत्र राबविल्या जात नसल्याने दिवसेंदिवस या अवैध तस्करांची हिंम्मत वाढतच चालली आहे. या तस्करांना अखेर आशीर्वाद कुणाचा? असा सवाल उपस्थित होत असून, ढिम्म प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे सध्या तंबाखु प्रतिबंध व जनजागृती सप्ताह सुरू आहे. दुसरीकडे मात्र, चित्र काही वेगळेच आहे. जागो जागी सुगंधित तंबाखु व गुटका विक्री केल्या जात आहे. शहरातील मोठ मोठ्या गोदामामधून याची खुलेआम विक्री होत आहे. परंतु, कारवाई मात्र, शून्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात कर्करोग आणि तरुण पिढीवर होणारे दृष्टपरिणाम टाळण्याच्या उद्देशाने सुगंधित तंबाखू, गुटखा, खर्रा, सिगारेट यांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री यावर परिपूर्णपने राज्यशासनाने बंदी घातली आहे. परंतु, शहरासह तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूची विक्री, साठवणूक होत आहे. केवळ कधी लहर आलीच तर प्रशासनाकडून हातावर आणून पानावर खाणा-या लहान पानटपरी धारकासारख्या गरीबावर कागदावर दाखविण्यापुरती कारवाई केली जाते. मात्र, बडे व्यापारी तंबाखु तस्कर यांच्यावर मात्र, कुठलीही कारवाई होत नाही, ही दुदैवाचीच बाब म्हणावी लागेल. शहरातील दुध डेअरी परिसर,पडोली बाबुपेठ परिसर  बिनबा गेट परिसर, गंज वॉर्ड, मूल रोड, नागपूर रोड ओम नगर सिंधीबण येथून सर्वाधिक जास्त सुगंधी तंबाखूचा येत असतो आदी परिसरात मोठ मोठे व्यापारी सुगंधित तंबाखू व गुटखा साठवणूक व विक्री करीत आहे. परंतु, प्रशासन मात्र, बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे प्रशासन व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांमध्ये संगनमत होवून अर्थपूर्ण व्यवहारातून तर हा गोरखधंदा सुरू तर नाही ना..अशी शंका आता सुज्ञ नागरिकांमधून पुढे येत आहे. लॉकडाऊनच्या काळात तंबाखुचा तुटवडा निर्माण करून याच तस्कर तंबाखू व्यापा-यांनी कोट्यावधीची लुट सुरू केली. नागरिकांचा दबाव वाढल्यावर व एलसीबी ने छापेमारी सुरू केल्यावर अन्न आणि औषध प्रशासनाला जाग आली व मोठ्या प्रमाणात चंद्रपूरसह जिल्ह्यात कारवाई सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर आता कारवाई थंडबस्त्यात आहे. यामुळे या अवैध व्यावसायाला घेवून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. शहर व गावागावत सुगंधित तंबाखु व गुटका विक्रीचा अवैध व्यवसायातून कोट्यावधीचा मलिदा खावून लोकांचे आरोग्य अंधकारमय करणा-या या तंबाखू व गुटका तस्करांवर कारवाई कधी होणार..प्रशासनाला याप्रश्नी जाग येणार की केवळ जनजागृती कार्यक्रमापुरताच अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यरत राहणार असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post