अमरावती येथील अद्वितीय आत्मनिभ बालसंस्कार व योग शिक्षण केंद्र



अमरावती :- अमरावती सारख्या शहरात लहान बालकांवर एक मनुष्य म्हणून उत्तम संस्कार व्हावे व त्यांना उत्तम आरोग्याचा लाभ मिळावा ह्या ध्येयाने प्रेरित होऊन सौ. सारिका वासनिक ह्यांनी आत्मनिर्भर बाल संस्कार व योग शिक्षण केंद्राची रुजूवात केली. त्यांनी पारडी बेड्यातील अनेक गरीब मुलांना ह्यात समाविष्ट करून त्यांच्यावर उत्तम संस्कार व योग शिक्षण देऊन आत्मविश्वास जागविला.तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने 75 करोड सूर्य नमस्कार अभियानाअंतर्गत अनेक ठिकाणी सामूहिक सूर्य नमस्काराचे आयोजन केले.
त्याचप्रमाणे महिलांच्या विविध आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन अनेक ठिकाणी योग शिबिराचे यशस्वी आयोजन केले.
सौ. वासनिक ह्यांच्या वरील प्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन चंद्रपूर येथील प्रतिष्ठित योग केंद्राचे संचालक व वरिष्ठ योग शिक्षक श्री. मधुकर राजूरकर ह्यांनी कौतुक करीत प्रसंशा केली तसेच त्यांच्या व केंद्राच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
Post a Comment (0)
Previous Post Next Post