चंद्रपूर / दुर्गापूर :- मागील अनेक महिन्यापासून दुर्गापुरात दहशत माजविणाऱ्या अनेकांचे बळी घेणारा त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले.दिनांक 13/05/2022 रोजी पहाटे 3:56 वाजता चंद्रपुर वनपरिक्षेत्रातील दुर्गापुर नियाक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या वार्ड न. 1 वार्ड न 3 तसेच वेकोली परिसर, उर्जानगर, कोंडी, नेरी परिसरात धुमाकुळ घालून मानवी तास धोकादायक ठरलेला विचट (मादी) ला गुलाईज करून जेरबंद करण्यात वनविभाग यशस्वी झाले.घटनेची सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे मागील 3 महिन्यापासून दुर्गापुर ग्रामपंचायत व उर्जानगर ग्रामपंचायत तसेच बेकोली परिसरात बिबट घुमाकुळ घालून मानवावर हल्ले करीत होता. त्यामुळे तेथील जनतेचा वनविभागावर प्रचंड रोष होता व बिबट्याला ठार करावे अशी मागणी होती.
यावर आळा घालण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु होते. वरिष्ठ कार्यालयाकडून बिबट्याला जेरबंद किंवा ठार मारण्याची 10/05/2022 ला परवानगी देण्यात आली. त्याकरीता जेरबंद करण्यासाठी 4 पिजरे, कॅमेरा ट्रॅप तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपुर यांचे नेतृत्वात चंद्रपूर परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, संरक्षण पथक चंद्रपूर, आर. आर. पुनिट टिम चंद्रपूर, पशुवैद्यकीय अधिकारी, ता.अ.व्या.प्र. चंद्रपूर, शुटर RRT, स्थानिक PRT एकूण 35 सदस्य तर्फे गस्त करीत होते. विवट (मादी) पिंजऱ्याजवळ येत होती परंतु पिंजऱ्यात शिरत नव्हती. से मानवावर हल्ले करणारा विवट हा मांदी आहे हे घटनास्थळाजवळ लावलेल्या कॅमेरा ट्रैप मध्ये आलेल्या फोटोवरून निष्पन झाले व वनविभागाचे चमुने त्या बिबट चा शोध सुरु केला. दिनांक 12/05/2022 ला बिबट्याचा 3 चे सायंकाळी चम बिबटया चा वावर असलेल्या परिसरात मागोवा घेत असताना बाई न 3 कडे विचट 7:30 दरम्यान दिसल्याबाबत माहीती मिळाली. लगेच वनविभागाचे चमुने बिबटचा शोध सुरु केला असता, विट वार्ड नं 3 कडुन छट पूजा ग्राउंड मार्गे सिनाळा फाट्या जवळील झुडपात लपुन बसलेला आढळून आला. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी शुटर लक्ष ठेवून होते. त्याला ट्रांगुलाईज अथवा ठार करण्यासाठी बेट बांधण्यात आला व त्यावर पाळत ठेवण्यात आली. दिनांक 13/05/2022 ला अंदाजे पहाटे 3:45 वाजता बिबट्याने बेटची शिकार केली त्याच वेळेस वनविभागाचे शूटर यांनी त्याला इंगुलाईज गनद्वारे ट्रैगुलाईज केले.

