राहुल पावडे व जगन्नाथबाबा दारूबंदी संघर्ष समितीच्या दबावाने अखेर वैष्णवी अपार्टमेंट जवळ असलेल्या बिअर शॉपी वर प्रशासनाची कारवाई



चंद्रपूर :- जगन्नाथ बाबा नगरात वैष्णवी अपार्टमेंट इथे असलेली बिअर शॉपी सुरू असून तेथे मद्यपान करण्याचे सोय करण्यात आली होती, सद्या या परिसरात दारू व्यवसायिक सक्रिय झाले आहे. एका मागोमाग एक दारूची दुकाने थाटण्यात येत असल्याने, या वर, नागीनाबाग प्रभागाचे नगरसेवक राहुल पावडे यांनी आक्रमक भूमिका घेत यापूर्वीच प्रशासनास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता,

 शिवाय, शुक्रवारी नगरातील दारू दुकान सुरू झाल्याचे दारूबंदी समितीने राहुल पावडे याना काळविताच त्यांनी शेकडो नागरिकांसह दारू दुकानावर चालून जात दारू दुकान बंद पडले.कितीही गुन्हे दाखल करा, पण दारू दुकाने बंद करूच, अशी भुमीका राहुल पावडे यांनी घेतली. या नंतर आज रविवारी सकाळी वैष्णवी अपार्टमेंट जवळ असलेल्या बिअर शॉपी चे अवैध शेड पाडण्यात आले, परंतु, शेड पडल्यानंतर आता प्रशासनाने या भागातील दारू दुकाने बंद करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच नागरिकांमधील रोष वाढत चालला आहे. दारुशक्ती विरुद्ध लोकशक्ती असा संघर्ष जगन्नाथ बाबा नगरात बघायला मिळत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post