चंद्रपूर :- महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या कार्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते महान समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमहापौर राहुल पावडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना उपमहापौर राहुल पावडे म्हणाले सत्यशोधक थोर समाज सुधारक शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उदगाते महात्मा जोतिराव फुलेंनी समाजातल्या दीन,दलितांसाठी आणि बहुजन समाजातील एकंदरीत घटकाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य चंदनासारखे झिजविले.शेतक-या असूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म इ.ग्रंथाची निर्मिती करुन समता, बंधुता आणि समान न्यायाची प्रतिष्ठापना केली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ही दोन व्यक्ती नसून एक विचार आहे खऱ्या अर्थाने समाजाला उन्नती च्या दिशेने घेऊन जाणारे आहेत असे मत या ठिकाणी बोलताना केले याप्रसंगी प्राध्यापक रवि जोगी भाजपा मंडळ महामंत्री संजय निखारे महेश राऊत सचिन बोबडे सत्यम गाणार सुशांत आकेवार अमोल मते अमित गौरकार चेतन घागरघुडे आदींची प्रामुख्याने उपस्थित होते
