चंद्रपूर :-चंद्रपूर शहरातील जगन्नाथबाबा मठ परिसरातील चौकात राम सेतू पुलालगत नवीन देशी दारुभट्टी व बियर शॉपीला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान याविरोधात जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनही सुरू आहे.दारू दुकान विरोधात जनमत चाचणी घेण्यात येणार आहे यामध्ये जगनाथ बाबा नगर येथुन हजारोंच्या संख्येने लोक फॉर्म भरून प्रशासनाला पाठवले जाणार आहे घराघरातून विद्यार्थी वर्ग आणि तरुणाई यामध्ये सहभागी होणार आहे . जिल्ह्याचे पालकमंत्री कृपया या घटनेची नोंद घ्यावी आणि जनतेचा विस्पोट झाल्यास सर्वस्वी जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री जबाबदार राहणार असे मत यावेळी व्यक्त करत होते जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीने आपला संताप व्यक्त करत होते पालकमंत्र्यांनी या विषयाची नोंद घ्यावी आणि या विषयाला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दुकानाचे स्थलांतरण करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना सुमारे हजारोच्या संख्येने पत्र पाठवून दुकानाचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येणार आहे. जगन्नाथबाबा नगर परिसरातील प्रत्येक घरी जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांकडून पत्रावर स्वाक्षरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. असून या उपक्रमाला जगन्नाथबाबा नगर येथून सुरुवात करण्यात येणार आहे
