भद्रावती झालेल्या हत्येची मोबाईल लोकेशन ट्रेस करणे सुरू


भद्रावती :- येथील  झालेल्या युवतीचा मृतदेह आढळलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरविले आहे. 24 तास उलटून गेले असतानाही देखील सदर युवतीचे शीर शोधण्यात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे आरोपीने युवतीचे शीर इतर स्थळी विल्हेवाट लावण्याकरीता नेले असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आता पोलिसांनी मोबाईल टॉवर नेटवर्कच्या माध्यमातून त्यादिवशीचे सर्व लोकेशन ट्रेस करणे सुरू केले आहे. या मार्गावरील व परिसरातील उपलब्ध सर्व सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहे. घटनेला दोन दिवस लोटल्यावरही अद्याप एकही मिसींगची तक्रार भद्रावती अथवा चंद्रपूर व आसपासच्या परिसरातून आली नसल्याने सदर मृतक युवती ही या भागातील नसावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान याप्रकरणाचा तपास गतीने सुरू असून सर्व शक्यता तपासल्या जात आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post