ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रक वाहतूक शाखा कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला उतरला




सुदैवाने मोठा अनर्थ टळला

चंद्रपूर :- पेट्रोलचा एक अनियंत्रित ट्रक नागपूर चंद्रपूर मार्गावरून येत असताना वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला उतरला. सुदैवाने ट्रक पूर्णपणे उलटला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.एपी 15 टीए 5877 क्रमांकाचा ट्रक स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डानपुलावरून भरधाव वेगाने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाकडे येत होता. दरम्यान ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रक वाहतूक शाखा कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला उतरला. या मार्गावरून सतत जडवाहतूक सुरू असते. ट्रक रस्त्याकडेला उतरला असता बाजुलाच इलेक्ट्रीकचा पोल व डीपी आहे. सुदैवाने ट्रक पूर्णपणे उलटला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक एकाच जागी उभा करण्यात आला होता. ट्रक मागे अथवा पुढे घेण्याचा प्रयत्न करताना तो पलटी होण्याची शक्यता असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत सदर ट्रक रस्त्यावर चढविण्याकरीता प्रयत्न सुरू होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post