चंद्रपूर:- शहरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जगन्नाथ बाबा मठात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान रामनवमीच्या पूर्वसंध्येला मठातून रामनवमीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे ठिक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
सदर ही मिरवणूक जगन्नाथ बाबा बाबा मठातून अग्रेसर भवन मार्गे आली असता देवकी अपार्टमेंट जवळ चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांनी विधीवत पूजा करून श्रीराम रथाचे स्वागत केले.
याप्रसंगी महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे मित्र परिवार तर्फे राम भक्तांना सरबत पाणी बॉटल व बिस्कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे यांनी सर्व रामभक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा देवून सरबत वितरीत केले. यावेळी जय श्रीराम च्या जयघोषाने हा परिसर निनादून गेला होता. मागील दोन वर्षानंतर यंदा रामभक्तांमध्ये मोठा जल्लोषात व उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे मित्र परिवारातर्फे प्रा.रवि जोगी, संजय निखारे, महेश राऊत, सचिन बोबडे, अमित गौरकार, सुनिल डोंगरे, सुशांत आकेवार, सत्यम गाणार सुशांत शर्माजी अक्षय शेंडे महेश दरवे राहुल जाभूळकर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
