अमृत लाईनच्या खोदकामामुळे दोन युवक झाले अपघातग्रस्त

युवकांना रवी लोणकर यांनी मिळवून दिली आर्थिक मदत
चंद्रपूर - : चंद्रपूर येथील संपूर्ण शहरामध्ये सध्या अमृत योजनेच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहे. अशाच एका घटनेत मेन रोडवर  खोदून ठेवलेल्या खड्ड्यामुळे त्या खड्ड्यामध्ये पडून काही दिवसाआधी ओम येनूरकर आणि त्याचा मित्र सोनटक्के हे दोघे युवक गंभीरित्या जखमी झाले. यात त्यांना मोठी दुखापत झाली असून याबद्दल झालेल्या अपघाताची माहिती भाजपचे सिविल मंडळ अध्यक्ष रवी लोणकर यांना माहीत होताच त्यांनी सदर अपघातस्थळी जाऊन पाहणी केली आणि याबद्दलची माहिती त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली या शिवाय संबंधित ठेकेदारांना सुद्धा याबद्दल माहिती दिली व त्यांनी सतत केलेल्या प्रयत्नामुळे त्या अपघातात जखमी झालेल्या दोन युवकांना रवी लोणकर यांच्या प्रयत्नामुळे आर्थिक मदत मिळू शकली आहे. यापूर्वी सुद्धा रवी लोणकर यांनी गरजू लोकांची मदत केली असून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post